Wednesday, December 4, 2024
Homeताज्या घडामोडीPrakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांवर अँजिओग्राफी अन् अँजिओप्लास्टी; मतदारांना दिला ‘हा’ संदेश

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांवर अँजिओग्राफी अन् अँजिओप्लास्टी; मतदारांना दिला ‘हा’ संदेश

मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांची तब्येत खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी दोन्हीही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणूक रणसंग्रामाचं येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयातूनच आपल्या मतदारांना व्हिडिओमार्फत एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकरांनी व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश दिला आहे. त्यांनी मतदारांना बोलताना, मी सध्या आयसीयूमध्ये आहे. अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही झालेले आहे. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवलं आहे. निवडणुकीलाही सुरुवात झाली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ओबीसींसाठीही महत्वाची आहे. कारण विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

आपले आमदार निवडून आले, तर आरक्षणावरून हल्ला आपल्याला थांबवता येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपलं बहुमूल्य मत देऊन विजयी करा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहं आहे. ते हॉस्पिटलमध्ये दाखल असून, आयसीयूमधून त्यांनी हा संदेश जनतेला दिला आहे.

त्याचबरोबर एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचवण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार आहे. विधानसभेत आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येतो. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा, असेही त्यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -