राजश्री वटे
सोनेरी क्षणांचा !
रेशमी धाग्यांचा!
जरतारी कलकुसरीचा!!!
भरजरी गं पितांबर…
दिला फाडून…
आई गं…
काय झालं…
जीव कळवळला ना…
पण कशाने…
बंधू प्रेमाने की भरजरी पितांबर फाडला म्हणून!!
ही झाली आगळी वेगळी बहीण भावाची प्रेमाची परीभाषा!!
आजकाल भरजरी किमया सगळीकडे राज्य करते आहे!
सोनेरी चंदेरी जरीचे धागे भरुन वस्त्र विणणे म्हणजेच भर…जरी.. ‘भरजरी’!
भरजरी ! जरतारी !! बूट्टे दार !!! गोटेदार !!!! मखमली कापडाचे हे साथीदार !!!!!
मढवायला, सजवायला तय्यार !!!!!!
याला लागतात कारीगरी करणारे हात…
वरदान लाभलेलं असतं त्या हाताना कलेचं!
वस्त्रांमध्ये मानाचं वस्त्र म्हणजे शेला !!
कबिराचे विणतो शेले
कौसल्येचा राम बाई…
गीतकार गदीमा, पू. ल. संगीतकार व गायिका माणीक वर्मा … चित्रपट ‘देव पावला’!!
हे तिन मौल्यवान रत्नं असल्यावर देव पावणारच ! शेला भरजरीच होणार !!
एकेका धाग्याचं मनोगत आहे या गीतात…
एक एक धागा जोडी जानकीचा नाथ!!
पैठणीच्या जरतारी मोरावर किती मेहनत घेतात हे हात…मागावर !!
ती पैठणी नेसताच…पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा… असं तिचं लाडीक गुणगुणण्ं…!!!
पूर्वी देवदेवीकांचे चित्रपट खूप बघितले जायचे… लहान मुलांवर चांगले संस्कार करण्याचा तो एक भाग होता… असो!!
त्यातील भरजरी ऐश्वर्य लक्ष वेधून घेत असे…
राजापासून… भालदार चोपदारा पर्यंत…
राणीपासून… दासीपर्यंत!
बुटापासून… फेट्या पगडी पर्यंत… सर्व जरतारी, भरजरी !!
शामियानांचे झुळझुळीत रेशमी भरजरी पडदे…
दिवाने खास मखमली !!
असा सर्व ऐश्वर्य संपन्न श्रीमन्ती थाट !!!
मोठ मोठे सोनेरी हांडे
(सोन्याचे असतील ही)दरबाराची शान वाढवायचे!
नंतरच्या काळात…नावाजलेल्या खानदानी श्रीमंत घराण्यात जरीकांठी धोतर, रेशमी पंचे, गोटेदार पगड्या श्रीमंतीची झलक दाखवत असे! स्त्रीयांची ही देखण्या सौंदर्याची वेगळीच शान होती… मऊ मखमली बूट्टेदार गर्भरेशमी वस्त्र वरुन सोन्याने मढलेली!! मध्यंतरीच्या काळात…हे बऱ्याच प्रमाणात लुप्त झालं होतं… समाज आधुनिकतेकडे वळला होता…
ये सुट मेरा देखो…
ये बूट मेरा देखो…
जैसे गोरा कोई लंडन का…
आणि तिचं झालं होतं
ये गोटेदार लेहेंगा निकलू मै डाल के…
पुन्हा काळ बदलला…
सोनेरी ऐश्वर्याचे महत्त्व वाढायला लागले…
पारंपरिक मुल्य जपण्याची प्रथा फॅशन (fashion) म्हणून दिसून येते आहे.नवरी पेशवाईमध्ये झळकायला लागली आहे… तर नवरदेव डोक्यावर जरीकाठी टिळक पगडी, मोत्यांच्या माळांपासून जरीच्या मोजडीपर्यंत…जरीच जरी!!
या मागण्यांमुळे सणासुदीला बाजारातील सोनेरी झगमगाट वाढतो… फार मनमोहक दृश्य असतं ते… हे घेऊ की ते घेऊ!
ही बाजाराची श्रीमंती वेडं करुन सोडते… घर सजवताना खास पेशवाई ढंगाची सजावट केली जाते. मोती, घुंगरू, रेशमी वस्त्र याचा वापर दिसून येतो!एखाद्या लग्नात तर पेशव्यांच्या वाड्यावर आलो की काय… खरंच … असं वाटतं!!
कुठेतरी कोपऱ्यात रमा माधवची जोडी सोनेरी माहोल मधे गुलुगुलु करताना दिसते सुद्धा!! मोठ्या हॉटेल्समध्ये देखील पारंपारीक सजावट करुन जरदोजी, बनारसी,…. लोड तक्के गादया… असाही सोनेरी शाही थाट मांडलेला असतो…सोना ही सोना!! आपली संस्कृती घराघरात, व्यक्ती परत्वे समाजात झळकताना दिसते आहे!! दिवाळीत विद्युत माळानी घर सजविले जातं, पण दिवसभर उन्हात तान्हात पणत्या विकायला बसतात त्यांच्याकडून मातीच्या पणत्यानी अंगण सजवू या… आशेने प्रकाशाकडे बघणाऱ्या त्यांच्याकडे ही एक पणती पेटवू… त्यांची ही दिवाळी तेजोमय होईल अशी प्रार्थना करू! अशी ऐश्वर्य संपन्न जरतारी…लख लख चंदेरी तेजाची,न्यारी… दुनिया !!!