डॉ. विजया वाड
काही केल्या ठरत नव्हते सुभद्राचे. ठरले की मोडे. ठरले की काहीतरी बिघडे. “असं का होतं गं हेमा?” सुभद्राने आपल्या सखीला पुसले. “मी खरं सांगू का?” “हो. सांग ना!” “कडू वाटेल.” “सत्य कधी तरी कटू पण असतं गं मैत्रिणी.” “तुझे वडील.” “काय? माझे वडील.” “मी फार खरं ते. तुझा पगार पन्नास हजार आहे ना?” “हो. सातवा वेतनआयोग सरकारी कर्मचाऱ्यांवर मेहरबान झाला आहे. त्यामुळे एकदम त्रेचाळीसमध्ये सात हजारची वाढ गं हेमा.” “हेच ते पन्नास हजार कारणीभूत आहेत गं सुभद्रे.” “अगं पण का?” तुझ्या तीर्थरुपांना वाटतं की, पन्नास घरात येतात, ते विवाहानंतर सासर घरी जातील.” “हे काहीतरीच हं हेमा.” “खोटं काय त्यात?” “पंचवीस पंचवीस करीन नं मी!” “असं सासरच्यांना चालणार नाही.” “का नाही? माझ्या नवऱ्याचा पगार चाळीस पंचेचाळीस तर असेल.” “लग्न झालं की, मुलगी सासरी खाते, पिते, झोपते. त्यांचे कपडे, त्यांचे खाणे, पिणे! सासरचे निम्मे निम्मेला कबूल होणार नाहीत.” “कशावरून?” “माझ्यावरून.” “तुझ्यावरून काय गं मैत्रिणी?” “पै न पै सासू वाजवून घेते. बस ऐवजी रिक्षानं जावं म्हटलं, तर रिक्षाचे पैसे मोजून हातावर ठेवते. पक्की पक्काड आहे माझी सासरवाडी.” “ए शिव्या काय देतेस?” “मग काय गं करू सखी?” “चल! सोडून देऊया तो विषय.” “पण आता तू २९ ची झालीस सखे. तिशीनंतर बाया जाड दिसू लागतात. निब्बर वाटू लागतात. मुलं होणं कठीण होऊन बसतं.” “ऐश्वर्या बच्चन आता चाळिशीत परत आई होतीय गं सखी.” “बच्चन बाईंच सोड. मोठ्यांची मोठी दुखणी. अमिताभ लिजेंडरी मॅन आहे.” “अगं पण अभिषेक...” “वो तो ‘उसका’ बेटा है ना! यही है सबकुछ! मालामाल!” “समझी.” “तो बहुत अच्छा.” मग ती सुभद्राच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली,“संतती नियमनाच्या गोळ्या घेत असलीस, तर त्या ताबडतोब बंद कर.” “करते.” “दिवस राहीपर्यंत प्रयत्नशील रहा.” “ रहाते.” “ दॅटस् लाईक अ गुड वुड बी मदर.” मैत्रिणीने शाबासकीच दिली पाठीवर. “आता कसे दिवस राहात नाहीत तेच बघते.” मैत्रिणीने पदर खोचला. जणू तीच युद्धावर निघाली होती. मैत्रिणीला ती म्हणाली, “घरी गेलीस की लाडात ये.” “पण तो नोकरीवर गेला असेल.” “अगं मग उद्यावर ढकल. हाय काय अन् नाय काय! इतके दिवस वाया गेले, तशात आणखी एकाची भर.” सखीने रिमार्क पास केला आणि ती कृतकृत्य होत्साती स्मित हास्य करती झाली. ठरल्यासारखी ती घरी गेली. तो घरीच होता. तिला आनंद झाला. “ मला बाळ हवं” तिनं प्रस्ताव सादर केला. अगदी न संकोचता. “अगं पण दुजी खोली, तर हवी ना! बाळासाठी!” “ एका खोलीत का मुलं होत नाहीत? आमच्या आईला, तर पाच-पाच मुलं झाली.” “अगं २५-३० वर्षंे झाली त्याला. आताचा जमाना वेगळाय.” “वेगळं बिगळं काही नाही त्यात.” ती त्याच्याजवळ सरकली. सासू तेवढ्यात बाहेर आली. “ काही हवंय का आई?” “ चालू द्या तुमचं.” ती डोळे झाकून घेत म्हणाली. “ कसं नाही होत मूल, तेच बघते.” ती म्हणाली. “अगं पण!” तो गडबडला. “आता मी एवढी जवळ आलीय तर.” नवरा गडबडला. नि जवळ आलेल्या बायकोला त्याने गच्च धरले.






