Sunday, December 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजThackeray vs Shinde : ठाकरे -शिंदे समोरासमोर भिडणार; मंगळवारी कोल्हापुरात राडा होणार

Thackeray vs Shinde : ठाकरे -शिंदे समोरासमोर भिडणार; मंगळवारी कोल्हापुरात राडा होणार

कोल्हापुर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९९५ मध्ये कोल्हापूरमधून प्रचाराचा प्रारंभ केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखिल आपल्या प्रचाराचा शुभारंभ करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन करण्याचे ठरवले आहे. तसेच शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देखिल अंबाबाईचे दर्शन घेऊनच प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. (Thackeray-Shinde will face each other; Rada will be held in Kolhapur on Tuesday)

कोल्हापुरात शिवसेनेच्या दोन्ही गटांचा प्रचाराचा शुभारंभ एकाच दिवशी होणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेते एकाच दिवशी अंबाबाईचे दर्शन घेऊन तेथेच प्रचाराचा नारळ फोडून जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी कोल्हापुरात राजकीय हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अलीकडील आरोग्याच्या स्थितीनंतर ही त्यांची पहिली सार्वजनिक सभा असेल. त्यांनी अॅजिओप्लास्टी झाल्यानंतर मातोश्रीवर विश्रांती घेतली होती. परंतु आता ते कोल्हापुरात प्रचारात सहभागी होतील. कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गटाला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. त्यात काही माजी आमदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केल्यामुळे हा प्रचार त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील तपोवन मैदानात आयोजित सभेत ते प्रचाराचा शुभारंभ करतील. कोल्हापुरात प्रचारावेळी शिंदे गट आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्षावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांच्या शिंदे गटात प्रवेशानंतर सतेज पाटील यांनी काही टिकात्मक विधानं केली होती. त्यामुळे कोल्हापुरातील वातावरण चांगलेच तापले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गजेंद्र मोक्ष

मृदगंध…

- Advertisment -