पूर्णिमा शिंदे
वाळी सर्व सणांचा राजा. तेजोयमान प्रकाशाचा सण. आकाश उजळणारा सारा आसमंत फुलवणारा. अंगण दीपावणारा हा आनंदाचा सण. घर परिसर स्वच्छतेची नवलाई. सर्व सणांचा राजा प्रकाशाचा सण.
“दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या परशुरामाच्या’’
वसुबारस या दिवशी सर्वच जण गोमातेची पूजा करून नैवेद्य दाखवतात.दिवाळीच्या प्रत्येक दिवसांचे ऐतिहासिक कथेतून महत्त्व मोलाचे आहे. दीपावली हा दिव्यांचा प्रकाशाचा सण. दिवा पावित्र, मांगल्याचे प्रतीक अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण. अंधार दूर करणारा आनंददायी, मंगलमय प्रकाश अमूर्तकडून मूर्त रूप देणारा सण. फटाके, रोषणाई, सजावट, फराळ, रांगोळ्या शुभेच्छांसह मेजवानी आणि पाहुणचार. दिवाळी दीप म्हणजे दिवे ओळीने लावले जातात त्याला दीपावली म्हटले जाते. त्या दिव्यांच्या तेजाने सारे मंत्रमुग्ध होतात. भान हरपून जाते. चैतन्य उल्हासित होते. स्वास्थ्य व आरोग्यदायी दिवाळीसाठी मनःपूर्वक शुभचिंतन. शुभेच्छा दिल्या जातात सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्यांनी सप्तरंगांनी आपल्या जीवनाचे इंद्रधनुष्य उजळून निघो. आपल्या जीवनामध्ये रोगराई, दारिद्र्य, नैराश्य, दुःख यांचे निवारण होवो. हेच हे दिवे सांगतात. आकाशकंदिलातून आपले स्वप्न व महत्त्वाकांक्षा तशाच तेवत असतात. दारी असलेली सजावट, रोषणाई, दिवे हे त्याचेच प्रतीक आहे. घरदार, अंगण, परिसरातून स्वच्छता जशी करतो तशी आपल्या विचारांची सुद्धा स्वच्छता व्हावी. द्वेष, मद, मोह, मत्सर, हेवेदावे, क्रोध ही जळमटे स्वच्छ व्हावी. त्यांची जागा सद्भावना, सत्संग, विवेकबुद्धी जागृत व्हावी. समाज व मानवा प्रति ऐक्य, समता बंधुभावाचे स्वरूप परोपकार, स्नेह, प्रेमाचे स्वरूप यावे आणि या सृष्टीला भ्रष्ट, नष्ट होऊ न देता तिचे जतन केले पाहिजे. फटाके न वाजवता पर्यावरणाचे जतन केले पाहिजे. एकजुटीने संस्कृतीचे जतन केले पाहिजे.
आपण सर्व भल्या पहाटेला उठून सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान करतो. बलिप्रतिपदेच्या दिवशी साऱ्या विश्वाचा जो पोशिंदा आहे. बळीराजास सुखाचे राज्य यावे. ही समाधानाची नांदी म्हणून इडापिडा टळून बळीचे राज्य यावे. तसेच दुःख, दारिद्र्य दूर होण्यासाठी या दिवशी प्रार्थना केली जाते. लक्ष्मीपूजन अष्टलक्ष्मीची धनधान्य, ऐश्वर्या, वैभव, विजया, संतती, सन्मान, अन्नधान्य, शौर्य अशा महालक्ष्मीचे पूजन केले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करण्यात आला. म्हणून आपल्या आयुष्यातून दारिद्र्याचा दुःखाचा अविवेकाचा नरकासुर जाळून तिथे दिव्यांचा मंगल उत्सव साजरा करूया. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते. गोड मिठाई जेवू घालते. त्याच्या उदंड आयुष्याची प्रार्थना शुभाशीर्वाद देखील देते. भाऊ तिचे रक्षण करतो. असे म्हटले जाते १४ वर्षांचा वनवास संपवूून श्रीराम व सीता अयोध्यामध्ये याच दिवशी आले. तेव्हापासून सर्व घरांमध्ये दिवे लागले. प्रकाशमान झाले आणि ही दीपावली सगळेजण तेव्हापासून खऱ्या अर्थाने साजरी करू लागले.
नवरात्र उत्सव संपला की, सर्व स्त्रिया लगबगीने सुरुवात करतात ती साफसफाई असते, स्वच्छता, परिसर, घर, अंगण यांची. सहामाही परीक्षा संपते. मुलांना सुट्टी लागते ती दिवाळीची मज्जाच मजा. धमाल ती केवळ असते मुलांसाठीच व पुरुषांसाठी. स्त्रियांना मात्र अतिशय मोठ्या प्रमाणावर कामं असतं. पंचपक्वान्न बनवायचे असतात घरी पाहुणे असतात आणि मुलंही सुट्टीची घरी असतात. त्यामुळे हा सण मोठा सण सणांचा राजा दीपोत्सव. पाच दिवस तयारी, स्वच्छता, सजावट, खरेदी फराळ बनवणं आणि मग शुभेच्छांसाठी फराळ वाटपासाठी पाहुण्यांकडे जा. खरं तर इतकच दिवाळीचं महत्त्व नसून अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या या ज्योतींनी आपण आपलं अंगण जीवन उजळतो. मंगल्याचा प्रकाश सर्वांच्या जीवनात येवो. दिवाळीच्या छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा खूप महत्त्वाच्या मोठ्या गोष्टी दडलेल्या आहेत. आकाश कंदीलच पाहणार स्वप्न अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षाने कसा हेलकावे खात असतो. रांगोळीमध्ये इंद्रधनुष्याचे रंग भरले जातात ते सप्तरंग आयुष्यात यावे अशी आपण देवाला प्रार्थना करतो सुगंधी उठणे मंगल पहाटेच्या शुभ समयी उठून अभंग स्नान केले जाते, त्यामध्ये विचार शरीर मन पवित्र होतात. जिव्हाळ्याची भाऊबीज जीवाभावाच्या भावासाठी बहीण गोडधोडाचे जेवण बनवते आणि त्याला ओवाळते त्याच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देते पण त्या अंगणात ठेवत असतात एका पणतीमुळे अनेक तेवणाऱ्या ज्योतींनी ती आरास होते आणि म्हणून आपण आपले हेवेदावे, द्वेष मत्सर सोडून द्यावेत. सद्भावनेने एकमेकांना शुभेच्छा यावर्षी स्वच्छता करूया. विचारांची, भावनांची, मनाची आनंद लुटुया सहकार्याचा. शुभेच्छा शुभचिंतन देऊया निरोगी दीर्घायुष्याचे आणि फराळ देऊया.
“दिव्यांच्या तेजाने उजळू द्या अंगण
होवो सफल सकलजन
दीपावली शुभचिंतन!”