Thursday, September 18, 2025

दिवाळी पहाट

दिवाळी पहाट
अजूनही काळोखात, उभे जे आहेत दिवाळीचे दीप त्यांच्या, लावूया वाटेत विज्ञानाची जोड त्यांच्या, आयुष्याला देऊ ज्ञानाच्या मंदिरी सारे, सोबतीने जाऊ विषमतेचे तोडू पाश, हीच मनी आस दिवाळीच सांगे जोडू, मनाला मनास नको ते फटाके, नको दिव्य रोषणाई चैन विलासात दिवाळी, कोमेजून जाई सत्य, सुंदर, मंगलाने, दिवाळी सजावी स्नेहमय, आपुलकीने, मनी उजळावी घरोघरी दिसेल मग, हसरी दिवाळी दारापुढे सजेल मग, सुखाची रांगोळी दिवाळीचा हा प्रकाश नवा, सारीकडे दाटेल तेव्हा खरी दिवाळीची, पहाट उजाडेल.

काव्यकोडी-एकनाथ आव्हाड

१) दाणे काळे डाळ पांढरी वडे सांडगे पापड भारी चिकट मातीची जमीन काळी हे पौष्टिक कडधान्य कोणते पावसाळी? २) देवळे बांधली मशिदी उभारल्या विहिरी खोदल्या धर्मशाळा बांधल्या प्रजेच्या सुखाची काळजी त्या घेई मल्हारराव होळकरांच्या या कोण सूनबाई? ३) भारतीय स्वातंत्र्यलढ्यात घेतला सहभाग गोडगोष्टींतून मुलांची फुलवली बाग ‘खरा तो एकचि धर्म’ सांगितला त्यांनी आंतरभारतीची स्थापना केली बरं कोणी?
Comments
Add Comment