मुंबई: देशात सायबर क्राईमची प्रकरणे वेगाने वाढत आहे. सायबर गुन्हेगार आल्या दिवशी लोकांना फसवण्यासाठी विविध पद्धती वापरत आहेत. ही फसवणूक रोखण्यासाठी सरकारही अॅक्शन मोडमध्ये आले आहे आणि सातत्याने यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायकडून टेलिकॉप ऑपरेटर्सना आदेश दिले जात आहेत की ते आपल्या सिम कार्ड युजर्सचा डेटा सुरक्षित राखण्यासाठी सावधगिरी बाळगा
स्कॅमर्सपासून वाचणे होणार सोपे
सरकारच्या या निर्णयामुळे रिलायन्स जिओ, व्होडााफोन आयडिया, एअरटेल आणि बीएसएनएलच्या ग्राहकांनान स्कॅमर्सपासून वाचणे सोपे होईल. त्यांचे टेन्शन कमी होईल. सिम कार्डशी संबंधित नियम आज लागू होऊ शकतात.
सरकारने उचलली पावले
सरकारकडून फेक कॉल्स आणि मेसेजेसवर बंदी घालण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ट्रायनुसार टेलिकॉम ऑपरेटर्सला फेक कॉल्सवर बंदी घालण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. फेक कॉल्स आणि मेसेजेसच्या माध्यमातून स्कॅमर्स लोकांची फसवणूक करून त्यांचे बँक खाते खाली करू शकतात.
जाणून घ्या नियम
नव्या नियमानुसार फोनवर येणारे कॉल्स आणि मेसेजेस आधी टेलिकॉम ऑपरेटर्सकडून तपासले जातील. या नंबर्सचे काही कीवर्ड्सची ओळख करून ते मेसेजेस आणि कॉल्स लगेचच ब्लॉक केले जातील. याशिवाय सिम कार्ड युजर्सनी तक्रार केल्यास ते मेसेजेस आणि कॉल्स ब्लॉक केले जातील.