Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीOnePlus 13 झाला लाँच, 6000mAh बॅटरी आणि २४ जीबी रॅम

OnePlus 13 झाला लाँच, 6000mAh बॅटरी आणि २४ जीबी रॅम

मुंबई: OnePlusने आपला फ्लॅगशिप डिव्हाईस OnePlus 13 लाँच केला आहे. कंपनीने हा फोन चीनमध्ये लाँच केला आहे. याचे फीचर्स दमदार आहेत. ब्रांडने यात लेटेस्ट Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर दिला आहे. यात क्वाड कर्व्ड डिस्प्ले मिळतो. स्मार्टफोन ट्रिपल रेयर कॅमेरा सेटअपसोबत येतो.

ब्रांडने या फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिलेली आहे. एखाद्या फ्लॅगशिप फोनमध्ये मिळणारी सर्वात मोठी बॅटरी आहे. स्मार्टफोन वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह य्तो.

काय आहेत स्पेसिफिकेशन?

OnePlus 13मध्ये कंपनीने ६.८२ इंचाचा २के रेज्योलूशनवाला डिस्प्ले दिला आहे. हा एक LTPO AMOLED स्क्रीन आहे. यासोबत 4500Nits चा पीक ब्राईटनेससोबत येतो. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Elite प्रोसेसरवर काम करतो. यात २४ जीबी पर्यंत रॅम आणि १ टीबीपर्यंत स्टोरेज मिळतो.

यात ५० एमपी मेन लेन्स, ५० एमपी पॅरास्कोपक कॅमेरा आणि ५० एमपी अल्ट्रा वाईड अँगल लेन्ससोबत येतो. फ्रंटमध्ये कंपनीने ३२ एमपी सेल्फी कॅमेरा दिला आहे.

किती आहे किंमत?

चीनमध्ये OnePlus 13 कंपनीने चार कॉन्फिग्रेशन में लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 12GB RAM + 256GB स्टोरेजसह 4499 युआन (साधारण 53,200 रुपये) मध्ये आहे. तर 12GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 4,899 युआन (साधारण 57,900 रुपये) आहे.

16GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटला कंपनीने 5299 युआन (साधारण 62,600 रुपये) मध्ये लॉन्च केला आहे. तर 24GB RAM + 1TB स्टोरेज वेरिएंटची किंमत 5,999 युआन (साधारण 70,900 रुपये)आहे.
स्मार्टफोन तीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -