मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक जण नव्या वस्तू विकत घेतात. सोनं-चांदी, गाडी, घर अशा गोष्टी घेतात. असेच आज दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचं औचित्य साधत अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) तिचे स्वप्न पूर्ण केले आहे. अमृताने मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अमृताने या घराची पहिली झलक दाखवली आहे.
मुंबईत घर घेणं हे खूपच स्वप्नवत् वाटतंय. २२व्या मजल्यावर असलेलं हे माझं छोटंसं ३ बीएचके विश्व, मी त्याला ”एकम” असं नाव दिलंय आणि नवीन सुरूवात करून आरंभ केला आहे’, असे अमृताने म्हटलं आहे.
View this post on Instagram