Sunday, October 26, 2025
Happy Diwali

कधीही दुसऱ्याकडून मागून वापरू नका या गोष्टी, नाहीतर...

कधीही दुसऱ्याकडून मागून वापरू नका या गोष्टी, नाहीतर...

मुंबई: अनेकदा काही लोक एकमेकांच्या गोष्टी वापरण्याआधी काहीच विचार करत नाहीत. मात्र अनेकदा ही सवय आपल्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.

वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्यांच्या वस्तू वापरल्याने आपण कंगालही होऊ शकतो. पैशांची तंगी जाणवू शकते. वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्ती कधीही दुसऱ्या व्यक्तींचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधू नये.

वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्या व्यक्तीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधणे अशुभ होऊ शकते. अशी मान्यता आहे की एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याचे घड्याळ घातले तर त्याला आर्थिकसह प्रत्येक गोष्टीत वाईट वेळ येऊ शकते.

वास्तुशास्त्रानुसार कधीही कोणाचे कपडे घालू नयेत. असे करणे अशुभ असते. जर तुम्ही दुसऱ्यांचे कपडे घालत असाल तर तुम्हाला दारिद्र्य घेरू शकते. त्या व्यक्तीला आर्थिक रूपाने त्रास होऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार, चुकूनही दुसऱ्या व्यक्तीचा रूमाल मागून वापरू नये. दुसऱ्यांचा रूमाल वापरला तर यामुळे त्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >