Wednesday, July 9, 2025

Mumbai: मुंबईत फटाके फोडण्यावरून वाद, तरूणाची हत्या

Mumbai: मुंबईत फटाके फोडण्यावरून वाद, तरूणाची हत्या

मुंबई: मुंबईत ऐन दिवाळीत धक्कादायक घटना घडली आहे. फटाके फोडण्यावरून झालेल्या वादानंतर एका २० वर्षीय तरूणाची हत्या केल्याची घटना घडली. विवेक गुप्ता असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना अँटॉप हिल परिसरातील महाराष्ट्र नगरमध्ये घडली.


हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत तपास सुरू केला आहे. मृत तरूणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.


दरम्यान, तरूणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा