
'इपिक’ कार्ड म्हणजे काय?
'इपिक’ कार्ड म्हणजे 'इलेक्टेर्स फोटो आयडंटिफिकेशन कार्ड’ आहे. तर, या कार्डवर 'इपिक’ नंबर म्हणजेच मतदार ओळख क्रमांक दिलेला असतो. 'इपिक’ कार्डच्या वाटपाबाबत आम्ही पोस्ट विभागाला स्वतंत्र सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय संबंधित मतदारांपर्यंत निवडणुकीपूर्वीच इपिक कार्ड द्या. ज्या मतदारापर्यंत इपिक कार्ड पोहोचणार नाही त्यांना मोबाइलद्वारे संपर्क करून त्यांच्यापर्यंत इपिक कार्ड पोहोचविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.