Sunday, December 15, 2024
Homeताज्या घडामोडीLPG: ऐन दिवाळीत खिशाला ताण, ६२ रूपयांना महागला गॅस सिलेंडर

LPG: ऐन दिवाळीत खिशाला ताण, ६२ रूपयांना महागला गॅस सिलेंडर

मुंबई: देशभरात दिवाळीचा उत्साह प्रचंड आहे. त्यात ऐन दिवाळीतच सामान्यांना मोठा झटका बसला आहे. दिवाळीला महागाईचा जोरदार झटका बसला आहे. लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच म्हणजे १ नोव्हेंबरला गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

१९ किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात ६२ रूपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, तेल कंपन्यांकडून १४.२ किलोग्रॅम वजनाच्या सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. कमर्शियल गॅस सिलेंडरचे वाढलेले दर आजपासून म्हणजेच १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होतील.

आज नोव्हेंबरचा पहिला दिवस आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे दर ठरवले जातात. तेल कंपन्यांनी शुक्रवारपासून १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात ६२ रूपयांनी वाढ केली आहे.

दिल्लीमध्ये सिलेंडरचे दर – १७४० रूपयांवरून वाढून १८०२
कोलकातामध्ये सिलेंडरचे दर – १८५० रूपयांवरून वाढ १९११.५० रूपये
मुंबईत सिलेंडरचे दर – १६९२ रूपयांवरून वाढून १७५४ रूपये
चेन्नईत सिलेंडरचे दर – १९०३ रूपयांवरून वाढून १९६४ रूपये

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -