मुंबई: तुम्ही रोजच्या जीवनात नाश्त्यामद्ये ब्रेड खात असाल मात्र तुमच्या मनात असा विचार आला का की अखेर ब्रेडवर होल का असतात? ब्रेडवर होल ते बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान होतात. ही प्रक्रिया यीस्टमुळे होते. यीस्ट हे सूक्ष्म जीव आहे जे पिठातील साखरेला खाऊन कार्बन डाय ऑक्साईड गॅस बाहेर टाकते.
हा कार्बन डाय ऑक्साईड गॅस पिठामध्ये छोटे छोटे बुडबुडे बनवतो. जेव्हा पीठ हे ओव्हनमध्ये बेक केले जाते तेव्हा ते बुडबुडे फुगतात आणि ब्रेडमध्ये होल तयार होतात.
ब्रेडमध्ये ग्लुटेन नावाचे प्रोटीन असते. ग्लुटेनमुळे पीठ अधिक मऊसूत बनते आणि कार्बन डायऑक्साईड गॅस आत रोखण्यास मदत करते. जेव्हा पीठ मळले जाते तेव्हा ग्लुटेनचे तंतू एक जाळीसारखी संरचना बनवतात.
जेव्हा ही जाळी कार्बन डाय ऑक्साईड गॅसला अडकवते तेव्हा बुडबुडे बनतात. जेव्हा ब्रेडला बेक करतो तेव्हा हे बुडबुडे फुगतात आणि ब्रेडमध्ये होल तयार होतात. याशिवाय ब्रेडमध्ये होलचा आकार आणि संख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जसे यीस्टचे प्रमाण जितके जास्त असेल तितके होल अधिक असतात. तसेच पीठ जितके मळले जाईल तितके मजबूत ग्लुटेनचे तंतू बनतील आणि होल तितकेच मोठे होतील.