पाहा काय आहेत आजचे दर?
मुंबई : सणासुदीच्या काळात सोनं चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र अशातच सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. मात्र आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचा दरात (Gold Rate Today) काहीसा बदल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याची किंमत १२९३ रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता सोन्याच्या चमकेची झळ थोडी कमी बसणार आहे.
कसे आहेत आजचे दर ?
- २४ कॅरेट सोन्याचा भाव ८० हजार ५६०
- २२ कॅरेट सोन्याचा भाव ७३ हजार ८५० रुपये
- दरम्यान, १ किलो चांदीची किंमत आज ९७ हजार रुपये इतकी आहे.