Sunday, December 15, 2024
Homeताज्या घडामोडीDiwali : दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा ‘वाईट’

Diwali : दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा ‘वाईट’

गुणवत्ता मध्यम श्रेणीत; धूलिकणांची संख्या प्रचंड वाढली

मुंबई : दिवाळीच्या (Diwali) दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईतील हवेचा दर्जा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला गेला. मुंबईतील काही भागात गुरुवारी ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली, तर इतर भागात ‘वाईट’ ते ‘मध्यम’ श्रेणीत हवेची नोंद झाली होती. ही परिस्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. कमी आवाजाच्या मात्र अधिक आतषबाजी करणाऱ्या फटाक्यांमुळे शहरातील हवा गुरुवारपासून खालावली आहे.

मुंबईतील विमानतळ परिसर वगळता शुक्रवारी सर्व भागात धूलिकणांची संख्या प्रचंड वाढली होती. भायखळा, देवनार, कांदिवली, वांद्रे, मालाड आणि शिवडी भागात शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ‘वाईट’ हवा नोंदली गेली होती. येथील हवा निर्देशांक अनुक्रमे २०५, २०८, २६६, २०२, २५३, २८५ इतका होता. या सर्व भागांतील हवेची गुणवत्ता गुरुवारपासून खालावली आहे.

हवा निर्देशांक १०० पेक्षा अधिक असू नये, असे तज्ज्ञ म्हणणे आहे. नेमक्या दिवाळीतील दोन दिवसांत या नोंदीने शंभरी पार केली आहे. प्रदूषणाची ही मात्रा दमा आणि हृदयरोगाच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. मुंबईच्या अनेक भागातील हवेची गुणवत्ता शुक्रवारी संध्याकाळी ‘वाईट’ स्वरूपाची होती. हवेचा दर्जा सकाळी ‘मध्यम’ स्वरूपाचा होता. मात्र दुपारनंतर हवेची गुणवत्ता ढासळत गेली.

दरम्यान, फटाक्यांच्या रोषणाईबरोबरच परिसरात धुराचे लोटही पसरले होते. आवाजाच्या फटाक्यांच्या बरोबरीने नागरिकांनी फॅन्सी, रोषणाईचे फटाके वाजविल्याने हवेची गुणवत्ता खालावली आहे. विशेष करून बालके, गर्भवती, वृध्द आणि श्वसनविकार असलेल्या नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -