मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील टीआरपीच्या शर्यतीत कायम असणारी मालिका लवकरच प्रेक्षकांचं निरोप घेणार आहे. चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा लवकरच मालिकेचा अंतिम भाग प्रदर्शित केला जाईल. मालिकेतील अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी पोस्ट करत ही माहिती दिली.
आई कुठे काय करते या मालिकेचं कथानक बरीच वळणं घेताना दिसले. त्यामुळे प्रेक्षकांनी मालिका रटाळ झाली असून आता बंद करा अशी टीका करण्यात येत होती. दरम्यान आता स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ‘आई बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे आई कुठे काय करते ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
View this post on Instagram