Sunday, December 15, 2024
Homeताज्या घडामोडीबोइसर चाळीतील घरात धक्कादायक स्फोट; स्फोटाच कारण अस्पष्टच

बोइसर चाळीतील घरात धक्कादायक स्फोट; स्फोटाच कारण अस्पष्टच

पालघर: बोईसर शहरातील अवध नगरमधील दुबे चाळीमध्ये बुधवारी रात्री स्फोट होऊन चार जण जखमी झाले. हा स्फोट कशामुळे झाला हे स्पष्टपणे समजू शकले नाही. जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अवधनगरमधील दुबे चाळीत अचानकपणे झालेल्या या घटनेत दोन मुलं एक महिला आणि एक पुरुष हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती देताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी या घटनेत संपूर्ण परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे.

हा स्फोट इतका भीषण होता की, घरातील कपाटासह इतर वस्तूंचा चक्काचूर झाला असून येथील इमारतीच्या सिमेंट बांधकाम केलेल्या तीन मजबूत भिंती कोसळल्या. परंतु, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.अवधनगर अलसिफा हा परिसर दाट लोकवस्तीचा असून स्फोट झाल्यानंतर आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, असे सांगण्यात येत आहे.तर बोईसर पोलिस नेमका स्फोट कशामुळे घडला याचा तपास करत आहेत

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -