Sunday, December 15, 2024
Homeताज्या घडामोडीSpain Flood : स्पेनमध्ये पावसाचा हाहाकार! अतिवृष्टीमुळे ९५ लोकांचा मृत्यू

Spain Flood : स्पेनमध्ये पावसाचा हाहाकार! अतिवृष्टीमुळे ९५ लोकांचा मृत्यू

मैड्रिड : स्पेनमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे देशाच्या पूर्व भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. पुराच्या भीषण तडाख्यामुळे आतापर्यंत ९५ लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण अद्याप बेपत्ता आहेत. पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असून, हजारो नागरिकांचे घरे पाण्याखाली गेली आहेत.

स्पेनच्या पूर्व भागात पुराचा तडाखा बसला आहे. यामध्ये आतापर्यंत ९५ लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता झाले आहेत. त्याचबरोबर रस्त्यांना नदीचे स्वरुप आले असून लोकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीत ‘व्हॅलेन्सिया’चा पूलही कोसळला आहे. तसेच वीजपुरवठाही खंडित झाला आहे.

दरम्यान, देशातील परिस्थिती बिघडल्यानंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड़ों सांचेड़ा यांनी सांगितले की, डझनभर शहरे पुरात बुडाली आहेत. थोका अजून संपलेला नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

स्पेनच्या व्हॅलेन्सिया, अलीकांते आणि मर्सिया प्रदेशात पूराची तीव्रता अधिक आहे. या भागांमध्ये रस्ते, पूल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. व्हॅलेन्सियामधील एक मोठा पूल कोसळल्याने वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. तर वीजपुरवठा खंडित झाल्याने लाखो नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. या आपत्तीनंतर देशातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तातडीने सक्रिय झाली आहे. पूरग्रस्त भागांमध्ये बचावकार्य सुरू करण्यात आले असून नौदल आणि आपत्कालीन सेवांच्या पथकांकडून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वयंसेवी संस्था, आणि नागरिक या मदतकार्यात योगदान देत आहेत.

सरकारकडून विशेष आर्थिक आणि अन्नधान्य मदत पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेनचे पंतप्रधान पेड़ों सांचेड़ा यांनी नागरिकांना पुढील काळात अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की अजूनही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याचा धोका आहे. पंतप्रधानांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व विभागांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.अतिवृष्टी आणि पुरामुळे शाळा, बाजारपेठा, आणि सार्वजनिक ठिकाणे बंद आहेत. वाहतुकीवर झालेल्या परिणाम झाला आहे. तात्पुरता निवारा आणि अन्नसामग्री उपलब्ध करून देण्यात येत असली तरीही अनेक भागांत परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -