गांधीनगर : दिवाळी सणाला सुरुवात झाली असून देशभरात मोठ्या उत्साहात सण साजरा केला जात आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील कच्छमधील सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.
पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. दरवर्षीप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी यावेळीही गुजरातमधील कच्छमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पंतप्रधान मोदी आर्मीच्या ड्रेस परिधान केला असून त्यांनी जवानांना मिठाई देखील खाऊ घातली.
भारत – चीन सीमेवरही दिवाळी साजरी
भारत आणि चीनच्या सैनिकांनी दिवाळीनिमित्त एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला.