Wednesday, December 4, 2024
Homeक्रीडाIPL 2025: सीएसके, मुंबई आणि आरसीबीसह १० संघांनी जारी केली रिटेन खेळाडूंची...

IPL 2025: सीएसके, मुंबई आणि आरसीबीसह १० संघांनी जारी केली रिटेन खेळाडूंची यादी

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या हंगामाआधी मेगा लिलाव होत आहे. हा लिलाव नोव्हेंबरच्या शेवटी अथवा डिसेंबरच्या सुरूवातीला असू शकतो. मात्र त्याआधी सर्व १० फ्रेंचायझींनी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकतेच रिटेंशनबद्दल नियम जारी केलेत. यानुसार एक फ्रेंचायजी जास्तीत जास्त ६ खेळाडू रिटेन करू शकते. जर एखादा संघ ६ पेक्षा कमी खेळाडूंना रिटेन करत असेल तर त्या स्थितती फ्रेंचायजीला लिलावादरम्यान राईट टू मॅच कार्डचा वापर करण्याची संधी मिळेल.

IPL खेळाडूंची रिटेन्शन यादी

गुजरात टाइटन्स (GT)
– शुभमन गिल (१६.५ कोटी)
– राशिद खान (१८ कोटी)
– साई सुदर्शन (८.५ कोटी)
– शाहरुख खान (४ कोटी)
– राहुल तेवतिया (४ कोटी)

लखनऊ सुपर जायंट्स (LSG)
– निकोलस पूरन ( २१ कोटी)
– मयंक यादव (११ कोटी)
– रवि बिश्नोई (११ कोटी)
– आयुष बदोनी (४ कोटी)
– मोहसिन खान (४ कोटी)

मुंबई इंडियंस (MI)
– हार्दिक पंड्या (१६.३५ कोटी)
– सूर्यकुमार यादव (१६.३५ कोटी)
– रोहित शर्मा (१६.३० कोटी)
– जसप्रीत बुमराह (१८ कोटी)
– तिलक वर्मा (८ कोटी)

चेन्नई सुपर किंग्स(CSK)
– ऋतुराज गायकवाड( १८ कोटी)
– मथीशा पथिराना(१३ कोटी)
– शिवम दुबे (१२ कोटी)
– रवींद्र जडेजा (१८ कोटी)
– महेंद्रसिंग धोनी (४ कोटी)

सनरायजर्स हैदराबाद(SRH)
– पॅट कमिन्स (१८ कोटी)
– हेनरिक क्लासेन( २३ कोटी)
– अभिषेक शर्मा (१४ कोटी)
– ट्रेविस हेड (१४ कोटी)
– नितीश कुमार रेड्डी (६ कोटी)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)

– विराट कोहली (२१ कोटी)
– रजत पाटीदार (११ कोटी)
– यश दयाल ( ५ कोटी)

दिल्ली कॅपिटल्स (DC)
– अक्षर पटेल (१६.५० कोटी)
– कुलदीप यादव (१३.२५ कोटी)
– ट्रिस्टन स्टब्स (१० कोटी)
– अभिषेक पोरेल ( ४ कोटी)

कोलकाता नाईट रायडर्स(KKR)
– सुनील नरेन (१२ कोटी)
– रिंकु सिंह (१३ कोटी)
– आंद्रे रसेल (१२ कोटी)
– वरूण चक्रवर्ती( १२ कोटी)
– हर्षित राणा (४ कोटी)
– रमनदीप सिंह (४ कोटी)

पंजाब किंग्स (PBKS)
शशांक सिंह (५.५ कोटी)
– प्रभसिमरन सिंह (४ कोटी)

राजस्थान रॉयल्स(RR)
– संजू सॅमसन (१८ कोटी)
– यशस्वी जायसवाल (१८ कोटी)
– रियान पराग (१४ कोटी)
– ध्रुव जुरेल (१४ कोटी)
– शिमरॉन हेटमायर (११ कोटी)
– संदीप शर्मा( ४ कोटी)

दरम्यान, रिटेंशनमध्ये ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, फाफ डू प्लेसिस यांना त्यांच्या संघानी रिटेन केले नाही. या सर्वांनी आयपीएलच्या मागच्या हंगामात आपापल्या संघांचे नेतृत्व केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -