मुंबई: क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीगच्या चाहत्यांना आज आनंदाचा डबल डोस मिळणार आहे. आधीच आज दिवाळीचा सण आहे. दुसरे आयपीएलच्या सर्व १० फ्रेंचायजी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करत आहेत.
आयपीएल २०२५ हंगामाआधी मेगा लिलाव होत आहे. हा लिलाव या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस अथवा डिसेंबरच्या सुरूवातीला असू शकते. मात्र त्याआधी सर्व १० फ्रेंचायजी रिटेन खेळाडूंची यादी सादर करणार आहेत. याची शेवटची तारीख आज ३१ ऑक्टोबर आहे.
शमी आणि राहुलबाबत सस्पेन्स
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकतेच रिटेन्शनबाबत नियम जारी केले आहेत. यानुसार एक फ्रेंचायझी अधिकाधिक ६ खेळाडू रिटेन करू शकते. जर एखादा संघ ६ पेक्षा कमी खेळाडूंना रिटेन करत असेल तर त्या स्थितीत फ्रेंचायजीलला ऑक्शनच्या दरम्यान राईट टू मॅच कार्डचा वापर करण्याची संधी मिळेल.
रिटेन खेळाडूंची अधिकृत यादी समोर आली नाही. रिपोर्ट्सनुसार गुजरात टायटन्स मोहम्मद शमीला सोडू शकतात. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल लिलावात सामील होऊ शकतो.