मुंबई: बॉडीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास अनेक आजार आपल्याला घेरतात. अशातच तुम्ही दररोज मनुक्याचे सेवन करून शरीरातील रक्ताची कमतरता दूर करू शकता.
यासाठी दररोज रात्री एका भांड्यात मनुका ठेवून त्यात एक ग्लास पाणी टाकून झाकून ठेवा. सकाळी उठून ते पाणी आधी प्या आणि त्यानंतर मनुका खा.
यातील कॅल्शियम, आर्यन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यामुळे तुमच्या बॉडीला ताकद मिळेल. तसेच अॅनिमियाच्या समस्येपासून दूर राहता येईल.
मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते.याच्या सेवनाने पचनशक्ती सुधारते. सकाळी पोट स्वच्छ होईल.
मनुक्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाणही भरपूर असते ज्यामुळे हाडे आणि मांसपेशी सुधारतात.
मनुक्याचे दररोज सेवन केल्यास तुमच्या स्किनचा ग्लोही सुधारेल.