मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. दररोज दिवा लावल्याने सुख-समृ्द्धीचा वास होतो. वास्तुशास्त्रानुसार दिवा लावल्याने घरात सकारात्मकता राहते. नकारात्मकता निघून जाते.
वास्तुशास्त्रानुसार जर घरात नियमितपणे दिवा लावल्यास घरात नेहमी आनंदीआनंद राहतो. यामुळे घरात राहणाऱ्या लोकांमध्ये नेहमी सकारात्मकता राहते आणि जीवनात यश मिळते. पैशांची तंगी राहत नाही.
जर घरात आर्थिक समस्या सुरू असेल तर वास्तुशास्त्रानुसार एक खास जागी दिवा लावला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार धन प्राप्ती हवी असेल तर दररोज घराच्या दारावर साफसफाई करून दिवा लावला पाहिजे.
वास्तुशास्त्रानुसार सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला हे काम करावे. ज्या घराच्या चौकटीवर नेहमी दिवा लावला जातो तेथे लक्ष्मी मातेचे वास्तव्य कायम राहते. लक्ष्मी मातेच्या कृपेने घरातील कंगालपणा निघून जातो आणि कुटुंबात धन-दौलत वाढते.
टीप – वरील लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार याची पुष्टी करत नाही.संबंधित बाबींसाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.