Monday, October 20, 2025
Happy Diwali

अयोध्येत दीपोत्सव, बनले दोन गिनीज रेकॉर्ड

अयोध्येत दीपोत्सव, बनले दोन गिनीज रेकॉर्ड

मुंबई: या वर्षी अयोध्येमध्ये राम मंदिराचे उद्धाटन झाल्यानंतर पहिली दिवाळी साजरी केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येतील दिवाळी प्रसिद्ध आहे आणि यंदाच्या वर्षीही पुन्हा दिवाळी चर्चेत आली आहे. उत्तर प्रदेशने बुधवारी अयोध्येत दीपोत्सवादरम्यान दोन नवे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनले आहेत.

हे रेकॉर्ड सर्वाधिक लोकांनी दिवे पेटवले आणि सोबतच सगळ्यात मोठे तेलाचे दिवे लावल्याचे रेकॉर्ड बनले आहेत. २५, १२, ५८५ लाख दिवे लावत हा रेकॉर्ड उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभाग आणि अयोध्येच्या जिल्हा प्रशासनाने बनवला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यक्रमादरम्यान गिनीजच्या एका अधिकाऱ्याकडून सर्टिफिकेट घेतले.

२५ लाख दिव्यांची आरास

आठव्या दीपोत्सवादरम्यान शरयू नदीच्या किनारी २५ लाखाहून अधिक मातीचे दिवे लावण्यात आले. यामुळे सर्वाधिक दिवे लावण्याचा रेकॉर्ड बनला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की स्थानिक कारागिरांना दिव्यांची ऑर्डर देण्यात आली होती. आदित्यनाथ यांनी या समारंभाचे नेतृत्व केले आणि आपल्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांसह काही दिवे लावत दीपोत्सवाचा शुभारंभ केला. या वर्षी २२ जानेवारीला रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर हा पहिला दीपोत्सव होता.

Comments
Add Comment