मुंबई: ऐश्वर्या १ ऑक्टोबरला आपला ५१वा वाढदिवस साजरा करणार आहे. अभिनेत्रीने १९९७ मध्ये आलेला सिनेमा और प्यार हो गया सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या सिने करिअरला २७ वर्षे झाली आहेत आणि इतक्या वर्षात तिने केवळ आपली ओळखच बनवली नाही तर जबरदस्त कमाई केली. ऐश्वर्या राय सिनेमांमध्ये जरी कमी अॅक्टिव्ह असली तरी त्यानंतरही दर वर्षी कोट्यावधींची कमाई करते.
ऐश्वर्या राय श्रीमंतीच्या बाबतीत अनेक दिग्गज कलाकारांना मात देते. ती बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीची नेटवर्थ तिच्या पती अभिषेक बच्चनपेक्षाही अधिक आहे. रिपोर्टनुसार ऐश्वर्या रायची नेटवर्थ ८०० कोटी रूपये आहे. ही नेटवर्थ तिचे पती अभिषेक बच्चनपेक्षाही अधिक आहे ज्याची एकूण संपत्ती २८० कोटी रूपये आहे.
ऐश्वर्या राय एका सिनेमासाठी भारीभक्कम रक्कम वसूल करते. ती एका सिनेमासाठी साधारण १० कोटी रूपये चार्ज करते. इतकंच नव्हे तर अनेक ब्राँड्सचाही चेहरा आहे. अशातच ब्राँड एंडॉर्समेंटमधून ती चांगली कमाईही करते. ती दर दिवसाला साधारण ६-७ कोटी रूपये चार्ज करते.