मुंबई : ऐन निवडणुकीच्या काळात मुंबई पोलीस दलातील २४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सलग आठ वर्षापेक्षा अधिक काळ मुंबईत सेवा केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या.
१११ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर मुंबईत अवघे ११ पोलीस निरीक्षक मुंबई बाहेरून आले. मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षकाची मंजूर पदे १०३२ आहेत. मात्र ३१ जुलैपर्यंत कार्यरत ८८१ होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता २४५ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे निवडणुकीच्या कामावर होणार परिणाम होण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत आता नवीन पोलीस इन्स्पेक्टर येण्यास तयार नाहीत. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने या बदल्या केल्यामुळे नवीन पोलीस निरीक्षक यांना प्रक्रिया समजून घेण्यासच निवडणुकीचा काळ देखील संपून जाईल.