Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीSrinivas Vanaga: ३६ तासांपासून बेपत्ता, ३ वाजता मध्यरात्री श्रीनिवास वनगा घरी परतले,...

Srinivas Vanaga: ३६ तासांपासून बेपत्ता, ३ वाजता मध्यरात्री श्रीनिवास वनगा घरी परतले, पत्नीला म्हणाले…

पालघर : आपल्या पुनर्वसनाच्या चिंतेमुळे ३६ तासांपासून अज्ञातवासात असलेल्या श्रीनिवास वनगा (Srinivas Vanaga) यांचा कुटुंबीयांशी संपर्क झाला आहे . आमदार श्रीनिवास वनगा मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास हे आपल्या घरी येऊन पुन्हा माघारी गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला उमेदवारी दिली नसल्याने मी व्यथीत झालो आहे आणि त्यामुळे मला आरामाची गरज आहे, असं सांगून श्रीनिवास वनगा आपल्या काही मित्रांसोबत पुन्हा माघारी गेल्याची माहिती समोर आली आहे.

श्रीनिवास वनगा (Palghar Srinivas Vanaga) नॉट रिचेबल असलेले आता कुटुंबीयांच्या संपर्कात आल्याचं पाहायला मिळतंय. यामुळे कुटुंबियांची आणि पोलिसांची चिंता आता काहीशी कमी झाली आहे. मात्र श्रीनिवास वनगा घरी परतलेले आपल्या मित्रांसोबत परत कुठे गेले हे आपल्या पत्नीला देखील त्यांनी सांगितलेलं नाही. श्रीनिवास वनगा यांचं तिकीट नाकारल्याने नाराज झालेले श्रीनिवास आता यापुढे आपली राजकीय भूमिका काय घेतात हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होऊ शकतं.

सर्वत्र श्रीनिवास वनगा यांचीच चर्चा

पालघर विधानसभेचे शिंदे गटाचे विद्यामान आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापून पालघरच्या विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांना उमेदवारी देण्यात आली. राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यानंतर श्रीनिवास वनगा खूप नाराज झाल्याचे दिसून आले. श्रीनिवास वनगा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या सर्वप्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात श्रीनिवास वनगा यांचीच सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आश्वासन

श्रीनिवास वनगा हे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने आकांत केला होता. माझे पती डिप्रेशनमध्ये आहेत, त्यांनी अन्नपाणी सोडून दिलं आहे, असंही त्यांच्या पत्नीने म्हटले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी वनगा यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. विधानपरिषदेवर श्रीनिवास वनगा यांना संधी देण्यात येईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी वनगा यांच्या पत्नीला दिल्याचं समजत आहे. दरम्यान, श्रीनिवास वनगा आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यामुळे ही निवडणूक लढवणार नाहीत, ही बाब स्पष्ट झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -