नवी मुंबई : कोकण रेल्वेने विविध मार्गावर धावणाऱ्या बिगर पावसाळी आठ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबरपासून गाड्यांच्या फेऱ्यानुसार सुधारित वेळापत्रकाची अमंलबजावणी केली जाणार आहे.
करमाळी- लोकमान्य टिळक टर्मिनल (२२११६) एक्स्प्रेसचा कणकवली स्थानकात सांयकाळी ४:२२ ऐवजी ४:३२ मिनिटांनी पोहचणार आहे. ७ नोव्हेेंबरपासून हा बदल लागू होणार आहे. त्याचप्रमाणे वास्को द गामा – पटणा (१२७४१) एक्स्प्रेसची रत्नागिरी स्थानकावर पोहोचण्याची सुधारित वेळ रात्री १२:३५
वाजता करण्यात आली आहे. तर मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन मांंडवी एक्स्प्रेस नडवली स्थानकात दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी पोहचणार आहे.
या गाड्यांचा समावेश
लोकमान्य टिळक टर्मिनल – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस चिपळूण स्थानकावर सायंकाळी ७:४२ वाजता पोहचेल. १ नोव्हेंबरपासून हे वेळापत्रक लागू होणार आहे.
एर्नाकुलम जंक्शन – अजमेर (१२९७७), कोचुवेली – पोरबंदर एक्स्प्रेस ( २०९०९), भावनगर – कोचुवेली (१९२६०) तसेच पोरबंदर ते कोचुवेली (२०९१०) एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल केल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.
मध्य रेल्वे सोडणार दिवाळीसाठी जादा गाड्या
नागपूर येथून देशाच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मुंबई, पुणे आणि रेल्वेच्या ५७० विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मध्य रेल्वेने ५७० रेल्वे गाड्या सोडणार असून त्यातील १८० गाड्या राज्यात धावणार आहेत. नागपूर, पुणे, लातूर, सावंतवाडी रोड, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणाहून धावणार आहेत. तर, ३७८ सेवा या उत्तर भारतातील छपरा, बनारस, दानापूर, गोरखपूर, समस्तीपूर, संत्रागाछी, आसनसोल, आगरतळ, या विविध भागातील प्रवाशांसाठी आहेत.