मुंबई: दिवाळीतील प्रसिद्ध मिठायांमध्ये गुलाबजामुन, जिलेबी, हलवा, रसगुल्ला, करंजी, पायसम तसेच शाही तुकडा यांचा समावेश आहे. तुम्ही साखरेने बनलेल्या मिठाईंऐवजी खजूर, गुळापासून बनवलेल्या नैसर्गिक गोडव्याची मिठाई ट्राय करू शकता. मिठाई खरेदी करताना एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा की मिठाई दिसायला ताजी असल्यास मात्र त्याचा वास येत असेल तर ती चुकूनही घेऊ नका. जेव्हा मिठाई तुम्ही स्टोर करता तेव्हा एअरटाईट डब्यांमध्ये ठेवा.
बाजारात सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात नकली मिठाई विकल्या जातात. दुकानांमध्ये रंगीबेरंगी तसेच स्वादिष्ट मिठाईंची रास रचलेली असते. मात्र वाढलेली मागणी पाहता भेसळयुक्त मिठाईंचा धंदाही जोरात सुरू असतो. त्यामुळे बाजारातून मिठाई खरेदी करताना काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा.
भेसळयुक्त मिठाईंपासून राहा दूर
बाजारात तुम्ही मिठाई खरेदी करायला जाल तेव्हा तुम्हाला रंगीबेरंगी मिठाई दिसतील. सुंदर दिसणाऱ्या या मिठाईंपासून दूर राहिलेलेच बरे. कारण अशा प्रकारच्या मिठाई खाल्ल्याने अॅलर्जी, किडनीचे आजार तसेच श्वसनाच्या समस्या होऊ शकतात. यामुळे सणांची मजा कमी होईल.