Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

SSC-HSC Exam : बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ! 'या' तारखेपर्यंत करु शकणार अर्ज

SSC-HSC Exam : बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ! 'या' तारखेपर्यंत करु शकणार अर्ज

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेबाबत (HSC Ekam) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी भराव्या लागणाऱ्या अर्जाची मुदतवाढ करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांना आता ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबतचे प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे.



काय आहे परीक्षेचे वेळापत्रक?



  • बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५

  • बारावी- प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन : २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५

  • दहावी परीक्षा : २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५

  • दहावी- प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२५

Comments
Add Comment