मुंबई: स्मार्टफोन हा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. दिवाळीनिमित्त काही चुकांमुळे तुमचा फोन खराब होऊ शकतो. आपला स्मार्टफोन आपण सगळीकडे वापरत असतो. मात्र आपल्या या सवयीमुळे दिवाळीमध्ये आपला फोन खराब होऊ शकतो.
जर तुम्ही फटाके फोडताना मोबाईल वापरत असाल तर यावेळेस एखादा अपघात होऊ शकतो. सोबतच फोन खराबही होऊ शकतो. खरंतर अनेकजण फटाके फोडताना त्याचा व्हिडिओ बनवत असतात. अशातच फोन पडू शकतो अथवा फटाक्यांमुळे फोन खराबही होऊ शकतो.
जर तुम्ही दिवाळीनिमित्त व्हिडिओ रेकॉर्ड करत असाल तर काही सावधानता बाळगली पाहिजे. तुम्हाला थोड्या अंतरावर राहून व्हिडिओ बनवला पाहिजे. फोन आगीच्या जवळ नाही गेला पाहिजे. दिवा लावतानाही फोन दूर ठेवला पाहिजे. नाहीतर गरमीमुळे फोन खराब होऊ शकतो.
उष्णतेमुळेही फोनचे अनेक पार्ट्स खराब होऊ शकतात. अशातच तुम्हाला लक्षात आले पाहिजे फोन आगीच्या जवळ नाही गेला पाहिजे.
मदरबोर्ड आणि आयसीसारखे अनेक पार्ट्स असतात जे उष्णतेमुळे खराब होतात. यांना रिप्लेस करण्यासाठी तुम्हाला खर्चही लागू शकतो.