मुंबई: सणासुदीच्या दिवसांमध्ये पोटाचे आरोग्य चांगले राखणे महत्त्वाचे असते कारण खराब पोटामुळे तुमचा मूड, एनर्जी लेव्हल आणि इम्युनिटीवर परिणाम होतो. पोटाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काही टिप्स…
हेल्दी जेवण घ्या
कमी प्रमाणात जेवण करा. जेवण चांगले चावून खा आणि अधिक खाऊ नका. सणांसाठी जाताना हलके जेवण करण्याचा प्रयत्न करू शकता.
हायड्रेट राहा
पचनासाठी मदत करणे आणि पोट फुगण्यापासून बचावासाठी भरपूर पाणी प्या.
अनहेल्दी डाएट घेऊ नका
पचनासाठी जड, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका. सोबतच मिठाईंचे सेवनही मर्यादित प्रमाणात करा.
एक्सरसाईज करा
सक्रिय राहिल्याने पचनास मदत मिळते. तसेच अतिरिक्त कॅलरीजही बर्न होतात.