मुंबई: दिवाळीदरम्यान फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात होतात. अनेकदा फटाक्यांमुळे हात तसेच चेहऱ्याला दुखापत होऊ शकते. अनेकदा ही दुखापत गंभीरही असू शकते. यामुळे त्वचेची तसेच डोळ्यांची जळजळ होते.
फटाके फोडताना शरीराचा एखादा भाग भाजल्यास त्या ठिकाणी थंड पाणी लावा. यामुळे सूज तसेच त्रास कमी होण्यास मदत मिळते. कमीत कमी २० मिनिटे भाजलेल्या ठिकाणी थंड पाण्याने भिजवलेला कपडा लावा. जर तुमच्याकडे वाहते पाणी नसेल तर तुम्ही ज्यूस, बीअर अथवा थंड दुधाचा वापर करू शकता.
ज्या ठिकाणी भाजले आहे ती जागा काही काळ थंड केल्यानंतर साफ करा आणि काही काळ झाकून ठेवा. जर गरज असेल तर आपात्कालीन सेवांना कॉल करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
भाजलेला भाग थंड पाण्यात बुडवा अथवा थंड पाण्यात भिजवलेला कपडा त्यावर लावा. सूज अथवा फोड येण्याआधी दागिने अथवा घट्ट कपडे काढा. ती जागा सुकवून, किटाणूविरहित ड्रेसिंगने झाका.