मुंबई: देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवी दिवाळी ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये लोकांना ३६५ दिवसांच्या रिचार्ज प्लानवर संपूर्ण १०० रूपयांची सूट दिली जात आहे. देशात दिवाळीचा सण आा आहे. अशातच अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स सादर करत असतात. जेव्हापासून खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे तेव्हापासून बीएसएनएलकडे अनेक जण आकर्षित झाले आहेत.
BSNLचा १९९९ रूपयांचा रिचार्ज प्लान
कंपनीने १९९९ रूपयांच्या या रिचार्ज प्लानवर १०० रूपयांचा डिस्काऊंट सादर केला आहे. डिस्काऊंटनंतर या रिचार्जची किंमत १८९९ रूपये झाली आहे. आता तुम्हाला १८९९ रूपयांच्या रिचार्जमध्ये तेच सारे फायदे मिळतील जे १९९९ रूपयांमध्ये मिळत होते. या रिचार्ज प्लानची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे.
या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला ६०० जीबी डेटा मिळतो. याशिवाय या प्लानमध्ये लोकांना दररोज १०० फ्री एसएमएससह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लानची किंमत खूप कमी आहे.
Airtel चा १९९९ रूपयांचा प्लान
दुसरीकडे एअरटेलच्या १९९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल बोलायचे झाल्यास याची व्हॅलिडिटीही ३६५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला २४ जीबी डेटासह दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. तर या प्लानमध्ये युजर्सला अपोलो 24/7, विंक म्युझिक, स्पॅम प्रोटेक्शन आणि एक्स्ट्रीम प्लेससारखे फायदे मिळतात.
अशातच बीएसएनएलचा १८९९ रूपयांचा प्लान इतर कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्त मानला जात आहे.