Thursday, December 12, 2024
Homeमहामुंबईआभार फाउंडेशनचा ‘माणुसकीची भिंत’ उपक्रम!

आभार फाउंडेशनचा ‘माणुसकीची भिंत’ उपक्रम!

मुंबई : माणुसकीची भिंत ही संकल्पना समाजातील गरजू आणि देणाऱ्यांमधील एक अनोखी जोडणे बनली आहे. पुंडलिक लोकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आणि आभार फाउंडेशनच्या पुढाकाराने यशस्वीपणे राबवला गेलेला हा उपक्रम यंदा १७ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पेनिन्सुला बिझनेस पार्क, लोअर परेल येथे आयोजित करण्यात आला होता.

यंदा या उपक्रमात तब्बल ४५००० पेक्षा जास्त कपडे, खेळणी, चप्पल, शालेय साहित्य आणि गृहोपयोगी वस्तू जमा झाल्या, ज्यामधून ३५००० हून अधिक वस्तू गरजवंतांना वाटप करण्यात आल्या. या वस्तू घेणाऱ्या गरजवंतांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंदच माणुसकीचा खरा चेहरा होता. उर्वरित वस्तूवर प्रक्रिया करून खेडेगाव, आदिवासी पाडे, वृद्धाश्रम आणि महिलाश्रम यांना वाटण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत, असे फाउंडेशनचे सदस्य नेताजी सावंत यांनी सांगितले. आभार फाउंडेशनचे अध्यक्ष महेश चव्हाण यांनी या उपक्रमाची संकल्पना उलगडताना सांगितले, देणाऱ्याच्या मनात नेहमीच माणुसकी जिवंत असते.

परंतु, गरजू व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्या व्यक्तींनाही मदत कुठून मिळेल हे माहीत नसते. या माणुसकीच्या भिंतीने या दोन्ही वर्गांना एकत्र आणले आहे. घरात अडगळीत असलेल्या वस्तूंनी कोणाच्या जीवनात मोठा बदल घडवता येतो, हे या उपक्रमातून सिद्ध झाले आहे.”यावर्षीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, आभार फाउंडेशनने खेड्यांतील शाळकरी मुलांसाठी १००० सायकल्स उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. प्रवासाच्या साधना अभावी शाळा सोडणाऱ्या मुलांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळावी यासाठी फाउंडेशनने हा पुढाकार घेतला आहे. मुंबई अग्निशमन दलाचे उपप्रमुख बनगर साहेब आणि विभागीय अधिकारी माटले साहेब यांनी पहिली मदत म्हणून नवीन सायकल्स दान केल्या.

बऱ्याच हाउसिंग सोसायटीमधून जुन्या सायकल उपलब्ध झाल्या त्या दुरुस्त करून गरजवंतांपर्यंत पोहचवला जातील. हा उपक्रम गरजू मुलांच्या शिक्षणासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -