लाखो रुपयांचा माल जळून खाक
मुंबई : उल्हासनगरच्या गजानन मार्केट परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग (Ulhasnagar Fire) लागल्याचे समोर आले आहे. उल्हासनगर आणि कल्याण अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, या आगीमध्ये दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. आग लागण्याचे कारण अद्यापही समोर आले नाही. मात्र कपड्यांच्या दुकानाजवळ फटाक्यांचे मार्केट असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.