नवी दिल्ली : देशभरातील वाढते अपघात पाहता यामध्ये दुचाकीस्वारांच्या अपघाताची आकडेवारी मोठी आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकार मोठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. रस्ता सुरक्षा लक्षात घेऊन केंद्र सरकारने तब्बल १६२ हेल्मेट उत्पादक कंपन्यांवर बंदी घातली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी नामांकित कंपन्यांच्या नावावर बनावट हेल्मेट विकले जातात. रस्त्याच्या कडेला हेल्मेट विकणाऱ्यांवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे. या सर्व कंपन्या बीएसआय (ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स इंडिया) च्या मानकांनुसार हेल्मेट तयार करत नव्हत्या. त्यामुळे सरकारने या कंपन्यांवर कारवाई केली आहे.