Friday, December 13, 2024
Homeक्राईमRanjith Balakrishnan : अभिनेत्याचा लैंगिक छळ! प्रसिद्ध दिग्दर्शकावर पुन्हा गुन्हा दाखल

Ranjith Balakrishnan : अभिनेत्याचा लैंगिक छळ! प्रसिद्ध दिग्दर्शकावर पुन्हा गुन्हा दाखल

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रंजित बालकृष्णन यांनी आतापर्यंत केलेले सर्व चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीत दिग्गज दिग्दर्शक म्हणून यांची ओळख निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे याच दिग्दर्शकावर लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

बंगुळुरुमधील एका ३१ वर्षीय अभिनेत्याने दिग्दर्शक रंजीत बालकृष्णन यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. एका हॉटेलमध्ये बोलवून दिग्दर्शकाने अभिनेत्यावर लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेत्याने सांगितले की, तो दिग्दर्शक रंजितला पहिल्यांदा कोझिकोडमध्ये भेटला होता, जेव्हा ते दिग्दर्शक ‘बावुतीयुदे नमाथिल’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. ऑडिशनच्या बहाण्याने त्याला हॉटेलमध्ये बोलावून जबरदस्तीने माझे कपडे काढायला लावले आणि लैंगिक छळ केला,अशी तक्रार अभिनेत्याने केली आहे.

अभिनेत्रीनेही केली लैंगिक छळाची तक्रार

याआधीही रंजीतवर एका बंगाली अभिनेत्रीने लैंगिक छळाचे आरोप केले होते. रंजितने तिला २००९ मध्ये ‘पलेरी मणिक्यम’ चित्रपटाच्या ऑडिशनच्या बहाण्याने बोलावून तिला अश्लील प्रकारे स्पर्श केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता.

तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणाऱ्या दिग्दर्शक रंजितविरोधात सततच्या होणाऱ्या या आरोपांमुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -