Wednesday, December 4, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसंघाची शंभरी...

संघाची शंभरी…

वासुदेव कुलकर्णी

राष्ट्रभक्ती, भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि प्रसार आणि नि:स्वार्थ समाजसेवा याच ध्येयाने स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. गेल्या शंभर वर्षांच्या काळात या संघटनेने आपला मूळ ध्येयवाद, उद्देश आणि राष्ट्रनिर्मितीच्या मूलभूत कार्याचा चौफेर विस्तार केला; पण पूर्ण स्वावलंबी, शक्तिशाली, आत्मनिर्भर राष्ट्रनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या कोट्यवधी समर्पित स्वयंसेवकांची फळीही निर्माण केली. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रभक्ती, भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि प्रसार आणि नि:स्वार्थ समाजसेवा याच ध्येयाने स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. गेल्या शंभर वर्षांच्या काळात या संघटनेने आपला मूळ ध्येयवाद, उद्देश आणि राष्ट्रनिर्मितीच्या मूलभूत कार्याचा चौफेर विस्तार केला; पण पूर्ण स्वावलंबी, शक्तिशाली, आत्मनिर्भर राष्ट्रनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या कोट्यवधी समर्पित स्वयंसेवकांची फळीही निर्माण केली. संपूर्ण देशात राष्ट्राभिमानाच्या जागृतीबरोबरच भारताला मातृभूमी मानणारे सर्व हिंदू हे भारतीय अशी हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेत वर्ण, जातिभेदविरहीत एकजूट करत हिंदू समाजनिर्मितीसाठी विचारप्रबोधनही केले. सांस्कृतिक संघटनेने आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सुरू केलेल्या संघ परिवारातल्या भारतीय किसान संघ, सेवाभारती, संस्कृतभारती, स्वदेशी जागरण मंच, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, राष्ट्रसेविका समिती, संस्कार भारती अशा विविध संस्थांद्वारे संस्कृती संवर्धनाबरोबरच गेली हजारो वर्षे उपेक्षित आणि वंचित राहिलेल्या कोट्यवधी आदिवासींना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठीही समर्पितपणे कार्य केले. कोणत्याही मोहमयी पदाची अपेक्षा न ठेवता संघाच्या राष्ट्रीय विचारसरणीनुसार एक कोटीच्या आसपास स्वयंसेवक कार्य करतात. अशाच प्रकारे कार्य करणाऱ्या कोणत्याही संघटनांपेक्षा हे नक्कीच उजवे असे चित्र आहे. संघटनेचे सुमारे पन्नास हजार प्रचारक येथे राष्ट्रसेवेला आपले जीवन अखंडपणे अर्पण करत असतात. त्यांना ना पैशाची अपेक्षा असते ना घरदाराची. आपल्यामागे असलेल्या घराची व्यवस्था कोणी लावून दिली, तर हे कार्यकर्ते अगदी मणिपूर, मेघालय, आसामसारख्या दूरस्थ असलेल्या प्रदेशात जोखमीचे काम करत असतात.
संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ च्या विजयादशमीच्या मुहूर्तावर लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे, पण साऱ्या जगभरात या वटवृक्षाच्या फांद्या आणि पारंब्यांचा विस्तारही झाला आहे. काळानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संघ परिवाराशी संलग्न विविध संस्थांची स्थापना केली आणि या संस्थांनीही समाजसेवेचा नवा मानदंड निर्माण केला. भूकंप, महापूर यांसह विविध नैसर्गिक आपत्तीच्या संकटातही संघाचे स्वयंसेवक आणि कार्यकर्ते धावून जातात आणि आपत्तीग्रस्तांना नि:स्वार्थपणे सहाय्य करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही फॅसिस्ट, कडवे हिंदुत्वनिष्ठ आणि प्रतिगामी विचारांची, मनुवादाचे म्हणजेच जातीय वर्णवादाचे समर्थन करणारी संघटना असल्याची टीका या वाटचालीमध्ये सातत्याने होत असली तरी प्रत्यक्षात मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवाराच्या संस्थांनी जातीभेदविरहित एकजुटीनेच समाजसेवेचे कार्य सुरू ठेवले आहे. चारित्र्य, शीलसंवर्धनाचे प्रशिक्षण देत भारतीय संस्कृती आणि नीतिमूल्यांचा आदर्श जपत संघाने सामाजिक कार्याचा विस्तार करतानाच धर्मांध मुस्लीम आणि धर्मवेड्या ख्रिश्चन शक्तींना कडाडून विरोध केला आहे. भारतात आदर्श आणि चारित्र्यशील पिढ्या घडाव्यात, यासाठीच गेली शंभर वर्षे संघाचे हे सामाजिक आणि राष्ट्रसेवेचे कार्य अखंड सुरू आहे.

प्रारंभीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राजकारणात सक्रिय सहभाग घ्यायचा नाही, हे धोरण स्वीकारले आणि ते अमलातही आणले. पण, स्वातंत्र्य मिळाल्यावर संसदीय लोकशाहीत तेव्हाच्या प्रबळ काँग्रेस पक्षाला प्रबळ ठरणारा राजकीय पर्याय असावा, ही विचारसरणी माजी सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांनी स्वीकारली आणि प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी आणि बलशाली राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या राजकीय पक्षाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि या नव्या पक्षाच्या व्यापक संघटन कार्यासाठी संघाचे समर्पित कार्यकर्तेही नव्या पक्षाला दिले. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या संघविचाराच्या आणि व्यापक राष्ट्रीय विचाराने राष्ट्रीय पक्षाची बांधणी करणाऱ्या ‘भारतीय जनसंघ’ या राष्ट्रवादी पक्षाच्या संस्थापकांमध्ये दीनदयाळ उपाध्याय, बलराज मधोक आणि नानाजी देशमुख या कुशल संघटकांचा आणि अटलबिहारी वाजपेयी या प्रखर राष्ट्रवादी विचारांच्या नेत्याचाही सहभाग झाला. २१ ऑक्टोबर १९५१ या दिवशी भारतीय जनसंघाची स्थापना झाली आणि बलशाली भारताच्या निर्मितीसाठी हिंदुराष्ट्रवाद, हिंदुत्व, अखंड मानवतावाद, आर्थिक राष्ट्रवाद, राष्ट्रीय सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि संवर्धन या ध्येयवादाने काँग्रेसला राष्ट्रवादी राजकीय पक्षाचा पर्याय दिला गेला. १९५३ मध्ये पक्षाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काश्मीरमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आणि जनसंघावर संघाच्या नेत्यांचे पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले.

साम्यवादाला आणि धर्मांध मुस्लीम शक्तीला कडाडून विरोध करणारे जनसंघाचे नेते आणि कार्यकर्ते यांना आपल्याला देशाच्या राजकारणात अखंड संघर्ष करावा लागणार याची पूर्ण खात्री होती. आपली पिढी देशव्यापी संघटन कार्यासाठीच खर्ची पडणार, याची खूणगाठ बांधूनच जनसंघाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा विस्तार करण्यासाठी अखंड परिश्रम घेतले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी काँग्रेसच्या विचारांशी झुंजही दिली. समान नागरी कायदा लागू व्हावा आणि काश्मीरमध्ये लावण्यात आलेले राज्यघटनेचे ३७० वे कलम रद्द केले जावे, अशी मागणी पक्षाने १९६७ मध्ये केली. जनसंघाचे माजी अध्यक्ष दीनदयाळ उपाध्याय यांच्या कारकिर्दीत पक्षाने एकात्म मानवतावादी विचारधारेचा स्वीकार केला. समाजवादी नेते राममनोहर लोहिया हेही उपाध्याय यांच्या विचारांशी सहमत होते. काँग्रेसची सत्तेची मक्तेदारी संपवण्यासाठी १९६७ मध्ये विरोधी पक्षाच्या संयुक्त विधायक दल या नव्या आघाडीमध्ये जनसंघ सामीलही झाला. या प्रयोगाला काही राज्यांमध्ये यश मिळाले, पण हा प्रयोग भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांच्या संघर्षात यशस्वी ठरला नाही. स्वदेशी, गोहत्याबंदी, यासह आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या जनसंघाची वाटचाल ‘एकला चलो रे’ धाटणीची होती. उपाध्याय यांच्या खुनानंतर बलराज मधोक, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे नेतेही अध्यक्ष झाले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात यासह मोजक्याच राज्यात जनसंघाची पाळेमुळे रुजली. १९६७ मधल्या निवडणुकीत जनसंघाने लोकसभेच्या ३५ जागा जिंकल्या.

कोणत्याही परिस्थितीमध्ये मूळ ध्येयाशी तडजोड न करता जनसंघाची वाटचाल सुरू राहिली. सत्तेसाठी संधिसाधूपणा आणि भ्रष्ट तडजोडी न केल्याने जनसंघाचा जनाधार हळूहळू वाढत गेला. जनसंघ हा प्रखर राष्ट्रवादी पक्ष असल्याचा आणि या पक्षातले नेते समर्पित ध्येयवादी असल्याचा विश्वास जनमानसात होता. पक्षात शिस्तही प्रभावी होती. भारतीयीकरणाचा आग्रह धरणाऱ्या बलराज मधोक यांनी जनसंघावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव वाढत असल्याचे मत व्यक्त करत संघाच्या प्रभावातून जनसंघ मुक्त केला पाहिजे, असा विचार मांडला तेव्हा पक्षाचे अध्यक्ष असलेल्या याच मधोक यांची पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या उलट आता आम्हाला संघाच्या कार्यकर्त्यांची आवश्यकता उरलेली नाही, हे पहिल्यांदाच पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा जाहीरपणे म्हणाले, तेव्हा त्यांना पक्षाने जाब विचारला नाही. मधोक बोलले तेव्हा जनसंघावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असलेली पकड अधिक मजबूत, भक्कम आणि कायम झालेली होती आणि मधोक हे संघाच्या शीर्षस्थानावरून दूर गेले होते. लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांती आंदोलन सुरू केल्यावर जनसंघानेही त्यात सक्रिय सहभाग आंदोलनात घेतला. १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केंद्र सरकारने बंदी तर घातलीच, पण संघ आणि जनसंघाच्या बहुतांश नेत्यांना आणि लाखो स्वयंसेवकांना तुरुंगात डांबले. लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जनसंघाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या अपूर्व त्यागामुळे त्यांची जनमानसातली प्रतिमा अधिक उजळून निघाली. १९७७ मध्ये आणीबाणी उठवून लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या जाताच सर्वच विरोधी पक्षांनी आपल्या स्वतंत्र राजकीय पक्षांचे विसर्जन करून जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ‘जनता’ पक्षात घरोबा केला. तेव्हा जनसंघही विसर्जित झाला. त्यावेळी स्वतंत्र, जनसंघ, समाजवादी, संघटना काँग्रेस हे प्रमुख पक्ष या नव्या पक्षात आपले स्वतंत्र अस्तित्व सोडून दाखल झाले. त्या निवडणुकीमध्ये जनता पक्षाला बहुमत मिळाले. वाजपेयी, अडवाणी यांच्यासह काही नेते जनता पक्षाच्या केंद्र सरकारमध्ये मंत्रीही झाले. देशात हे पहिल्यांदाच घडत होते. पंतप्रधानपदाच्या संघर्षामुळे आणि गटबाजीने जनता पक्षाचे सरकार कोसळले, तरी जनसंघाचे माजी कार्यकर्ते आणि नेते जनता पक्षातच राहिले. त्यानंतर आजपर्यंत संघाचा इतिहास हा संघटनात्मक सामाजिक कार्यामध्ये वाहून घेऊन काम करण्याचा राहिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -