मनात धक्कादायक विचार, पत्नीकडून गौप्यस्फोट
पालघर : पालघरचे (Palghar) शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) आमदार श्रीनिवास वनगा (Srinivas Vanaga) मागील बारा तासांपासून बेपत्ता असल्याची बातमी समोर आली आहे. कुटुंबीयांसह पोलीस प्रशासनाकडून कडक तपास केला जात असून या घटनेमुळे श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज झाले. त्यानंतर श्रीनिवास वनगा हे बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली.
श्रीनिवास वनगा यांच्या मनात आत्महत्येचे विचार
श्रीनिवास वनगा हे काल संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यांनी घरातून बाहेर पडताना आपण कुठे जातोय हे कोणालाही सांगितले नाही. तसेच त्यांचे दोन्ही फोन बंद असून त्यांनी कोणाशीही संपर्क साधला नाही. विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे श्रीनिवास वनगा हे प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे.
सध्या श्रीनिवास वनगा यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अनेक कार्यकर्तेही त्यांच्या घराबाहेर जमले आहेत.