मुंबई: वजन घटवणयात सगळ्यात मोठी भूमिका तुमच्या डाएटची असते. याशिवाय तुम्ही जे दिवसभर शारीरिक क्रिया करतात त्यानेही फरक पडतो. निरोगी राहण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज ४५ मिनिटे चालण्याचा सल्ला दिला जातो. ज्या लोकांकडे वेळेची कमतरता आहे. ते १० मिनिटे धावून हा फायदा मिळवू शकतात. यामुळे हॉर्ट अॅटॅकचा धोका कमी होतो. तसेच वजनही वेगाने कमी होते.
हृदय राहते निरोगी
दररोज केवळ १० मिनिटे धावल्याने हृदय निरोगी राहते. यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो आणि हृदयाचे कार्य सुरळीत चालते. मांसपेशी वेगाने रक्त पंप करतात. यामुळे हृदय निरोगी राहते. यामुळे दररोज काही मिनिटे धावले पाहिजे.
वजन घटवणे
लठ्ठपणा कमी करण्यासाठी चालण्याऐवजी धावा. दररोज काही मिनिटे धावल्याने फॅट लवकर बर्न होते. यामुळे वजन कमी होते. धावल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. धावताना तुम्ही अधिक कॅलरीज बर्न होतात. यामुळे वजन घटवणे सोपे होते.
हॅपी हार्मोन्स वाढतात
जेव्हा तुम्ही पळता तेव्हा शरीरात हॅपी हार्मोन्स वाढतात. धावल्याने एचजीएस हॉर्मोन बनते. यामुळे शरीर आनंदी आणि निरोगी राहते. दररोज पळल्याने वाढते वय कमी करता येते.
झोपेमध्ये सुधारणा
ज्या लोकांना झोपेची समस्या आहे त्यांना दररोज धावल्याने फायदा होईल. धावल्याने तुमची झोप, झोपेचा पॅटर्न आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. केवळ १० मिनिटे धावल्याने अथवा कार्डिओ एक्सरसाईज केल्याने रात्री गाढ आणि चांगली झोप लागते.
हाडे-मांसपेशी मजबूत होतात
धावल्याने केवळ हृदयाशी संबंधितच फायदे मिळत नाहीत तर मांसपेशी आणि हाडेही मजबूत होतात. नियमितपणे धावल्याने पायांचे आणि कोर मसल्सची ताकद वाढते. धावल्याने ग्रोथ हार्मोनचे उत्पादन वाढते.
धावल्याने तणाव, चिंतासारख्या समस्यांमध्ये सुधारणा होते. धावल्याने मेंदूमध्ये एंडोर्फिन नावाचे हार्मोन रिलीज होते यामुळे मूड चांगला राहतो.