मुंबई: न्यूझीलंडविरुद्ध सध्या सुरू असलेली कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ४ टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. या दौऱ्यावर भारतीय संघ आपला पहिला टी-२० सामना ८ नोव्हेंबरला डरबनमध्ये खेळत आहे. यानंतर संघ १० नोव्हेंबरला होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी गकेबरहा जाणार. त्यानंतर सेंच्युरियनमध्ये १३ नोव्हेंबरला आणि जोहान्सबर्ग येथे १५ नोव्हेंबरला सामने खेळवले जातील.
आता दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या दौऱ्यावर संघासोबत असणार नाहीत. आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ ४ नोव्हेंबरला रवाना होईल. तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ११ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होत आहे. अशातच गंभीर केवळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकेल.
गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत व्ही व्ही एस लक्ष्मण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक असतील. चार सामन्यांची ही टी-२० मालिका आधी ठरलेली नव्हती मात्र बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांच्यातील बातचीतनंतर याला अंतिम रूप देण्यात आले.
साईराज बहुतुले, ऋषिकेश कानिटकर आणि सुभादीप घोषही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोचिंग स्टाफचा भाग असतील.