Wednesday, May 21, 2025

देशताज्या घडामोडी

केरळमध्ये फटाक्यांचा स्फोट, १५०हून अधिक जखमी

केरळमध्ये फटाक्यांचा स्फोट, १५०हून अधिक जखमी

तिरूअनंतपुरम: दिवाळीच्या आधी केरळच्या कासरगोड येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका मंदिरातील कार्यक्रमादरम्यान फटाक्यांच्या स्टोरेजमध्ये मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत १५०हून अधिक जण जखमी झाले आहेत. घाईगर्दीमध्ये सर्वांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे एका कार्यक्रमासाठी शेकडोंच्या संख्येने लोक जमले होते.


ही घटना अंजुताम्बल वीरारकावू मंदिरातील आहे. येथे मंदिरात वार्षिक कलियाट्टम उत्सव साजरा केला जात होते. कार्यक्रमासाठी फटाके मागवण्यात आले होते. हे फटाके एका स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते. यातच रात्री साडेबाराच्या सुमारास अचानक स्फोट होऊ लागले आणि पाहता पाहता धुराचे लोळ उठू लागले.


 


घटनेनंतर अनेक लोक मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. स्फोटामुळे तब्बल १५०हून अधिक जण जखमी झाले. यातील ९७ जणांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.


Comments
Add Comment