मुंबई: संत्र्याचा ज्यूस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. यात व्हिटामिन सी, पोटॅशियम, फायबरसारखी पोषकतत्वे असतात. जी आपल्याला निरोगी राखण्यासाठी फायदेशीर ठरतात. या ज्यूसमध्ये व्हिटामिन बी ९ आणि फोलेटही मिळते. यामुळे रक्त प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते.
तज्ञांच्या मते जर तुम्ही दररोज दोन ग्लास संत्र्याचा ज्यूस प्यायलात तर ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो. यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्त शरीरामध्ये प्रवाहते. यामुळे हॉर्ट प्रॉब्लेम्सपासून वाचता येते. संत्र्याचा ज्यूस किडनीस्टोनसाठी फायदेशीर ठरतो.
संत्र्याच्या ज्यूसमध्ये असे गुण आढळतात जे शरीराला डिटॉक्स करून हेल्दी ठेवण्यास मदत करतात. तज्ञानुसार संत्र्याच्या रसामध्ये व्हिटामिन सी, पोटॅशियम, सायट्रिक अॅसिड आणि फोलेटसारखी पोषकतत्वे असतात. सायट्रिक अॅसिड युरिनच्य पीएच व्हॅल्यू योग्य राखण्यास मदत करतात. तसेच किडनी स्टोन होण्यापासून रोखतात. दररोज सकाळी संत्र्याचा ताजा ज्यूस प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या होत नाही.