धनत्रयोदशी आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दिवाळी सणाला अगदी धमक्यात सुरुवात झाली आहे. सराफा बाजारात सणासुदीलाच सोने आणि चांदीचा भाव घसरल्याने ग्राहकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. बेशकिंमती धातुंचे दर तसे चढेच आहेत, तरीही मागणीत कमी आलेली नाही. ग्राहकांना काही कंपन्या घरबसल्या सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय देत आहेत. यातच मुकेश अंबानी यांची जिओ फायनान्स ही कंपनी पण काही मागे नाहीत. सध्या युपीआय प्लॅटफॉर्मपासून ते ॲप्सपर्यंत सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. अशातच Jio Finance केवळ १० रुपयांमध्ये डिजिटल गोल्ड खरेदीचा (Digital Gold) पर्याय देते.
मुकेश अंबानी यांच्या कंपनीची धन धना धन ऑफर
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्सने स्मार्ट गोल्ड योजना लाँच केल आहे. ग्राहकांना यामध्ये केवळ १० रुपयांत डिजिटल गोल्ड खरेदीची संधी मिळणार आहे. दिवाळीच्या सुरुवातीलाच धनत्रयोदशीला अंबानी यांच्या कंपनीने या धमाकेदार योजनेची सुरूवात केली आहे. ग्राहकांसाठी डिजिटल गोल्डसाठी कंपनीने खास ऑफर आणली आहे.
ग्राहक या सोन्याच्या गुंतवणुकीत त्याच्याकडील स्मार्ट गोल्ड युनिट कोणत्याही वेळी, रोख रक्कमेत, सोन्याच्या शिक्क्यात वा सोन्याच्या आभूषण, दाग-दागिन्यात बदलवू शकतो. या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकांना या योजनेत हजारो वा लाखो रुपये गुंतवणुकीची गरज नाही. केवळ १० रुपयांत ग्राहक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
चोरीची कोणतीही भीती नाही
स्मार्ट गोल्ड योजनेत सोनं चोरी होण्याची कोणतीही भीती नसते. डिजिटल गोल्ड जवळ बाळगण्याची गरज नाही. ते हरवण्याची भीती नाही. तसेच ते लॉकरमध्ये ठेऊन, त्यापोटी बँकेला पैसे मोजण्याची गरज नाही. चोरी होण्याची भीती नाही, हा एक मोठा फायदा आहे. तुम्ही खरेदी केलेले सोने हे २४ कॅरेट असते. ते इंश्योर्ड वॉल्टमध्ये ठेवण्यात येते. बाजारातील त्यावेळेच्या किंमतीनुसार त्याची विक्री करता येते.
सोन्यात गुंतवणुकीचे दोन पर्याय
सोन्यात गुंतवणुकीसाठी कंपनीकडून जिओ फायनान्स अॅपवर स्मार्टगोल्ड योजनेत ग्राहकांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. म्ही गुंतवणुकीची रक्कम यामध्ये निश्चित करून सोने खरेदी करू शकता. पण फिजिकल गोल्डची डिलिव्हरी केवळ ०.५ ग्रॅम अथवा त्यापेक्षा अधिक गुंतवणुकीवरच करण्यात येणार आहे. ०.५ ग्रॅम, १ ग्रॅम, २ ग्रॅम, ५ ग्रॅम आणि १० ग्रॅम मूल्यवर्गात सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे. जिओ फायनान्स अॅप्सवर थेट सोन्याचे शिक्के खरेदी करून ग्राहक होम डिलिव्हरीची सुविधा मिळवू शकतात.