Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीAnanya Panday: अलिशान बंगला, कार कलेक्शन...२६व्या वर्षी कोट्यावधीची मालकीण

Ananya Panday: अलिशान बंगला, कार कलेक्शन…२६व्या वर्षी कोट्यावधीची मालकीण

मुंबई: बॉलिवूडअभिनेत्री अनन्या पांडे ३० ऑक्टोबरला आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री आता २६ वर्षांची होत आहे. २०१९मध्ये आलेल्या स्टुंडंट ऑफ दी इयर २मधून तिने आपल्या सिने करिअरची सुरवात केली होती. ५ वर्षातच तिने आपली इंडस्ट्रीत ओळख बनवली आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केले आणि भरपूर पैसेही कमावलेत.

अनन्या पांडेचे अलिशान घ आहे. तिने २०२३मध्ये धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपले नवे घर खरेदी केले होते. तिच्या लक्झरियस कारचे कलेक्शनही आहे. १.७० कोटी रूपयांच्या बीएमडब्लू ७ सीरिजची ती मालकीण आहे. याशिवाय तिच्या कार कलेक्शनमध्ये १.८४ कोटी रूपयांची रेंज रोव्हर स्पोर्ट, ८८ लाखांची मर्सिडिज बेंझ ई क्लास, ३३ लाख रूपयांची स्कोडा कोडियाक आणि ३० लाखांची हुंडाई सांता फेही आहेत.

अनन्या पांडेची नेटवर्थ

पैशांच्या बाबतीत अनन्या पांडेकडे कोणतीही कमतरता नाही. ती कोट्यावधींची मालकीण आहे. मिडिया रिपोर्टनुसार२०१९मध्ये अनन्या पांडेची नेटवर्थ ५४ कोटी रूपये होते. २०२०मध्ये ही संपत्ती वाढून ५८ कोटी, २०२१मध्ये ६६ कोटी, २०२२मध्ये ७० कोटी रूपये झाली होती. अनन्याची सध्याची नेटवर्थ ७४ कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -