मुंबई: जिओच्या प्लॅटफॉर्मवर अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. या रिचार्ज प्लान्सच्या किंमती वेगवेगळ्या आहेत आणि फीचर्सही वेगवेगळे आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या सर्वात स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत.
किती आहे किंमत
तुम्हाला वर्षभर पुरणारा सर्वात स्वस्त रिचार्ज बद्दल सांगत आहोत. याची किंमत १८९९ रूपये आहे. जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि इतर फायदे मिळतील.
जिओच्या या रिचार्ज प्लानची व्हॅलिडिटी ३३६ दिवसांची आहे. म्हणजेच ११ महिन्यांपेक्षा अधिक व्हॅलिडिटी मिळते.
जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. याची माहिती जिओ पोर्टलवरून मिळते. जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला २४ जीबी इंटरनेट डेटा वापरण्यासाठी मिळतो. हा प्लान त्या लोकांसाठी ज्यांना केवळ कॉलिंगचा प्लान हवा आहे.
जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण ३६०० एसएमएस मिळतात. यामुळे युजर्स आपल्या गरजेच्या हिशेबाने वापरू शकतात. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये अनेक अॅप्स कॉम्प्लिमेंट्री मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा समावेश आहे.