Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणजनतेची सेवा करायची आहे ; विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे : निलेश...

जनतेची सेवा करायची आहे ; विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे : निलेश राणे

कुडाळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ-२६९ मधून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निलेश राणे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला. यावेळी खासदार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, काका कुडाळकर आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार नारायण राणे यांसह उपस्थित नेतेमंडळी यांनी निलेश राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आमच्या सोबत जनता आहे. जनतेची सेवा करणे, प्रश्न सोडवणे याला प्राधान्य राहील. गेल्या दहा वर्षात हा मतदारसंघ ओसाड होता. आपल्या भूमीची आपल्या जनतेची जी हेळसांड झाली. त्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सज्ज झालो आहे.

मी कोणावर टीका करणार नाही. जनतेची सेवा हेच लक्ष राहील. यापूर्वी जनतेने २८ व्या वर्षी खासदार बनवले. आता विधासभेसाठी पहिल्यांदा अर्ज भरणा करतोय. या मातीने येथील जनतेने राणे कुटुंबाला भरभरून प्रेम दिले. त्या जनतेची सेवा करायची आहे. जनतेला गृहीत धरणार नाही. जनतेच्या आशीर्वादाने मोठे मताधिक्य मिळवण्याचा प्रयत्न राहील. कुडाळ-मालवण सोबत सिंधुदुर्ग पर्यायाने महाराष्ट्रात जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खा. नारायण राणे , पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, रिपाई नेते आणि सर्व महायुती पदाधिकारी यांचे निलेश राणे यांनी आभार मानले आहेत.

राजकारणात सक्रिय झाल्यापासूनचं काम माय-बाप जनतेसमोर स्पष्ट आहे आणि त्यांच्या निर्णयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपल्या कुडाळ – मालवण मतदारसंघातील एक ही मत आपण आता वाया जाऊ देणार नाही, आपली भूमी पुन्हा भ्रष्टांच्या हाती जाऊ देणार नाही. – निलेश राणे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -