मुंबई:भारतीय संघ(indian cricket team) यावेळेस आपल्या घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. सुरूवातीच्या २ कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला पराभव पाहावा लागला.
यासोबतच न्यूझीलंड संघाने भारतीय जमिनीवर इतिहास रचला. टॉम लॅथमच्या नेतृत्वात किवी संघाने भारतात आपली पहिली द्विपक्षीय कसोटी मालिका जिंकली आहे. सोबतच रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये १२ वर्षे अजेय राहण्याचा पराक्रमही हुकला. भारतीय संघाचा याआधी २०१२मध्ये इंग्लंडकडून पराभव झाला होता.
पराभवानंतर माजी क्रिकेटर संजय मांजेरकर भडकले आणि त्यांनी रोहितवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की रोहित कसोटीमध्येही टी-२०च्या मानसिकतेने खेळतो आणि निर्णय घेत आहे.
मांजरेकरांनी एका चॅनेलला दिलेल्या माहितीत सांगितले, सर्फराज खानला खाली आणि वॉशिंग्टन सुंदरला त्याच्या आधी पाठवणे कारण तो डावखुरा फलंदाज आहे. हे अशा प्रकारचे निर्णय नाही घेतले पाहिजेत.
हे अजब आहे. रोहित शर्माला एक बाब जरूर लक्षात ठेवली पाहिजे ती कसोटी क्रिकेटमध्ये टी-२० सारखे निर्णय घेतले जाऊ नये. मला वाटते की त्याने खेळाडूंची संपूर्ण गुणवत्ता आणि त्यांच्या क्षमतेच्या हिशेबाने खेळले पाहिजे. दरम्यान, मांजरेकरांनी कोच गौतम गंभीरला सपोर्ट केला आहे.